Wakad fraud : महागड्या गिफ्टच्या आमिषाने महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज मित्राने पाठवलेले गिफ्ट विमानतळावर आले असून त्यात महागड्या वस्तू व दागिने असल्याचे सांगत महिलेकडून विविध कारणांसाठी (Wakad fraud) नऊ लाख 44 हजार रुपये घेत तिची फसवणूक केली. हा प्रकार 1 मार्च ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

सात मोबाईल क्रमांक धारक आणि चार बँक खाते धारक यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने रविवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime : 66 वर्षीय वृद्धाचे अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने थेरगाव येथील महिलेसोबत इंस्टाग्रामवरून ओळख केली. तिच्याशी व्हाट्सअप कॉल वरून गप्पा मारल्या. त्यानंतर त्या सोशल मीडियावरील मित्राने महिलेला अमेरिकेतून भेटवस्तू पाठवल्या असल्याचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या क्रमांकावरून, मेलआयडी वरून महिलेला मेसेज करत तिला खरोखर भेटवस्तू पाठवल्याचे आरोपीने जाणवून दिले.(wakad fraud) त्याने पाठवलेले गिफ्ट भारतात विमानतळावर आले असून त्यात खूप दागिने व महागड्या वस्तू आहेत, असे सांगून कस्टम ड्युटी चार्ज, अँटी मनी लॉन्डरिंग व इतर चार्जेस भरण्यासाठी तसेच टेस्को बँकेत खाते उघडण्याच्या नावाखाली तिच्याकडून नऊ लाख 44 हजार 930 रुपये घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच याबाबत तिने गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.