Wakad : डांगे चौकात फिरस्ती कामगाराचा खून; आयुक्तालयाच्या हद्दीत चार दिवसात सहा खून

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खुनाचे सत्र सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी सहावी खुनाची घटना घडली असून वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खुनाची घटना घडली आहे.

रोशन कांबळे (रा. धायरी, पुणे) असे खून झालेल्या फिरस्ती कामगाराचे नाव आहे.

दरम्यान,  पिंपरी – चिंचवड शहर खुनाच्या घटनांनी हादरले आहे. मागील चार दिवसांपासून दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. त्यातच ‘आम्ही खुनाच्या घटना रोखू शकत नाही’ अशा प्रतिक्रिया पोलिसांकडून येत आहेत.

निगडी, तळेगाव, चिखली, हिंजवडी, रावेत आणि आता वाकड परिसरात खुनाची सहावी घटना घडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.