BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : नोकरीच्या आमिषाने तरुणीला सव्वा लाखांचा गंडा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणीला सव्वा लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी रविवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून राजीव दीक्षित, श्रीनिवास राव यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांना आरोपींनी आपापसात संगनमत करून वारंवार फोन केला. रेड बुल इंडिया कंपनीत चांगल्या पदावर नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी बँकेच्या खात्याची माहिती विचारली. फिर्यादी यांनी माहिती सांगितली असता त्यांच्या खात्यातून 1 लाख 15 हजार 459 रुपये परस्पर हस्तांतरित करून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर साबळे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.