Wakad : फ्लिपकार्ट कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी करून तरुणीची 70 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लिपकार्ट कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून फोनवरून तरुणीकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्याद्वारे पेटीएमच्या माध्यमातून तरुणीच्या बँक खात्यातून 69 हजार 998 रुपये काढून घेतले. हा प्रकार 23 जानेवारी 2019 रोजी वाकड येथे घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धा किसन गराडे (वय 24, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रद्धा यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने फ्लिपकार्ट कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने फोनवर बोलत असताना श्रद्धा यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे आरोपीने पेटीएमद्वारे श्रद्धा यांच्या खात्यातून 69 हजार 998 रुपये काढून घेतले. याबाबत अज्ञात आरोपीवर फसवणुकीसह, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.