Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तरुणाला हॉकीस्टिक, लाकडी बांबू आणि चामडी पट्ट्याने मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास ताथवडे येथे घडला.

यशराज परेश कोरे (वय 25, रा. गाडारोड, सोनवणेवस्ती, ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद अर्जून पवार, सौरभ कुंजीर, वसीम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यासह एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरे हे त्यांच्या घराजवळील गोफणे वस्ती येथे पानटपरीवर गेले. त्यावेळी तेथे लकी नावाच्या मुलास ते म्हणाले, तू वसीम याच्या नादी लागू नकोस. त्यानंतर आरोपी तेथे आले. त्यांनी हॉकीस्टिकने फिर्यादी यांच्या हातावर मारून, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी बांबू व चामडी पट्ट्याने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.