Wakad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी पावणेतीनच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.

दीपक धोत्रे, विजय धोत्रे, गणेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक दयानंद कोडे (वय 23, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांच्या मित्राचे आरोपींसोबत भांडण झाले. ते भांडण फिर्यादी यांनी मध्यस्थी करून सोडवले. त्यानंतर फिर्यादी दीपक त्यांच्या दोन मित्रांसोबत तापकीर चौकातील श्री मल्हार पान शॉपसमोर गप्पा मारत थांबले असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी दीपक यांना घेराव घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जमलेल्या लोकांच्या दिशेने लाकडी दांडके भिरकावून दहशत निर्माण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.