Wakad : पूर्ववैमनस्यातून मारहाण करून मायलेकींचा विनयभंग 

एमपीसी न्यूज- पूर्वीच्या वादातून एकाने मायलेकींना मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. कावेरीनगर भाजी मंडई येथे गुरुवारी (दि.४) रात्री ही घटना घडली असून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी एका ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून नाना सोनवणे (रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय असून कावेरीनगर भाजी मंडई येथे गाळा आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात जुना वाद आहे. त्या वादाच्या रागातून आरोपी गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फिर्यादी यांच्या गाळ्याजवळ आला.
फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मुलींना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच अश्लील वर्तन करून विनयभंग केला. या घटनेनंतर आरोपीने पोबारा केला असून वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.