Walchand Nagar Police : वालचंद नगर पोलिसांनी दोन मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपींना केले जेरबंद

एमपीसी न्यूज – वालचंद नगर पोलिसांनी (Walchand Nagar Police) दोन मंदिरातील साहित्य चोरी प्रकरणातील दोन आरोपींना जेरबंद केली आहे. आरोपी गणेश भांडे (वय 34 वर्षे, रा. वकील वस्ती तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) व विकास भोसले (वय 30 वर्षे, रा. जुना बाजारतळ, विजय चौक, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) या दोघांना 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आली असून अटक करण्यात आले आहे.

या दोन्ही गुन्ह्यातील मंदिरातील चोरीस गेलेल्या एकूण सहा घंटा व स्पीकरचे मशीन असा 56,000 रुपये किंमतीचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली एचएफ डीलक्स मोटरसायकल किंमत रुपये 55,000 असा एकूण 1.11 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध इंदापूर, अकलूज, वालचंद नगर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Walchand Nagar Police

Swami Vivekananda Lecture : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता युवा पिढीने  जागरूक राहणे गरजेचे – जे. साई दीपक

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी वालचंद नगर (Walchand Nagar Police) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पिटकेश्वर गावचे श्री पिटकेश्वर मंदिर व शिरसाटवाडी गावचे हद्दीतील श्री मारुती मंदिर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील दोन्ही ठिकाणी घडलेल्या मंदिरातील साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा एन लातूरे यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून आरोपींना अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथून दोन्ही आरोपींना 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.

ही कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा एन लातूरे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, पिटकेश्वर पोलीस पाटील सचिन येरळकर, पोलीस मित्र ऋषिकेश ननवरे व समीर शेख यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.