Walchandnagar News : दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक

एमपीसी न्यूज –  पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात (Walchandnagar News) अटक केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.27) वालचंदनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली.

मोहन मल्हारी ठोंबरे असे अरोपीचे नाव असून तो वालचंदनगर पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार पदावर काम करत होता.

Pandharpur News : पंढरपुरात पार पडला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे याने फिर्यादीला त्याच्यावर दाखल असलेल्या तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी  व मदत करण्यासाठी म्हणून ठोंबरे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. ती लाच स्वीकारत असताना लाच-लुचपत विभागाने रंगेहात पकडले. याचा पुढील तपास लाच-लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करत आहेत.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.