Walekarwadi Crime News : वाल्हेकरवाडीत दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून एक लाख 57 हजार 500 ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली.

याप्रकरणी नितीन दत्तात्रय खताळ (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खताळ आणि त्यांची पत्नी हे दोघेही कामाला जातात. शुक्रवारी (दि.11) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान फिर्यादी खताळ यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

किचनमधील लाकडी कपाटाचा दरवाजा आणि लॉकर कशाच्यातरी साहाय्याने उचकटून आतील एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सहायक निरीक्षक अभिजित जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.