Walhekarwadi : आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी येथे उघडकीस आला आहे.

विशाल भंडे (वय 17, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार वाल्हेकरवाडी इथे एका भाड्याच्या घरामध्ये विशाल आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. तो मूळचा सोलापूरच्या करमाळा इथला असून औंधमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत होता. त्याशिवाय तो सकाळी घरोघरी पेपर टाकायचंही कामही करीत असे. घरातील सर्वजण गावाला गेले होते तर वडील कामासाठी बाहेर गेले गेल्यानंतर त्याने आत्महत्या केली. सकाळी पेपर टाकणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून पाहिलं तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

विशालचा मृतदेह शविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.