Pimpri News: पालिकेच्या निबंध स्पर्धेत वाळूंज, घोषवाक्यत गुपचूप, चित्रकला स्पर्धेत गुरव यांचा पहिला क्रमांक  

एमपीसी न्यूज – स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियाना अंतर्गत पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेत संध्या वाळूंज,  घोषवाक्य स्पर्धेत संध्या संजय गुपचूप आणि चित्रकला स्पर्धेत अस्मिता गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्वच्छ महाराष्ट्र/ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे. तसेच माहिती,  शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे. हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्या अनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  महापालिका क्षेत्रामधील नागरीक , एनजीओ, शाळा व महाविद्यालयीन ‍विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पालिकेच्या ईमेलवर घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी मोहिम, कोवीड 19 इ. स्वच्छता विषयक बाबींबाबत निबंध, चित्रकला, घोषवाक्य पाठविली. शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाने निकाल जाहीर करण्या करीता मुख्य समिक्षकाचे कामकाज पाहिले.

निबंध स्पर्धचा निकाल खालीलप्रमाणे –
संध्या रामदास वाळूंज प्रथम क्रमांक-कोविड 19  साथीच्या दरम्यान स्वच्छतेचे महत्व,  दत्तात्रय सुकलाल धनगर- द्वितीय क्रमांक (कोरोना- जबाबदारी, संकटातुन संघात रुपांतर) , शांताराम वाघ – तृतीय क्रमांक (स्वच्छता हा मूलमंत्र- हेच निरोगी आरोग्याचे तंत्र)

घोषवाक्य स्पर्धेत संध्या संजय गुपचूप-प्रथम,  दत्तात्रय वाघ-द्वितीय क्रमांक व  सार्थक सागर बंडलकर – तृतीय क्रंमाक अशी निवड करण्यात आलेली आहे. चित्रकला स्पर्धेत अस्मिता माधव गुरव – प्रथम क्रमांक-  कोविड 19  मध्ये स्वच्छतेचे महत्त्व, कामिनी माधव पाटील-‌द्वितीय क्रमांक –प्लास्टीक बंदी, साक्षी बनसोडे- तृतीय क्रमांक – स्वच्छ भारत अभियानाचे चित्र रेखाटले होते. प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रभागस्तरावर प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.