Wanwadi : भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वाहनाने धडक दिल्याने (Wanwadi) दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास केशव पाटोळे (वय 65, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कैलास पाटोळे (वय 58, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पिंपरीचे वकील सुशील मंचरकर यांची तक्रार भोवली; गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी सनद गेली

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास पाटोळे हे घोरपडी गाव परिसरात व्हिक्टोरिया रस्त्यावर दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात (Wanwadi) गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खरवडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.