Wanwadi : वानवडीत सराईत गुन्हेगारावर फायरिंग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज-वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगारावर (Wanwadi) फायरिंग करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वानवडीतील महंमदवाडी रोडवर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

चेतन बाळू जाधव (वय 21) आणि यश सुनील ससाने अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. श्री गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख याच्यावर आरोपींनी गोळीबार केला होता.

Pune :  पुण्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फैजान हा देखील सराईत गुन्हेगार आहे. आरोपी आणि फैजान यांच्यात पूर्वीपासूनच वाद आहेत. दरम्यान सोमवारी रात्री फैजान हा मंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. यातली एक गोळी पोटात लागल्याने फैजान हा जखमी झाला.
दरम्यान शहरात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांचाही या संपूर्ण प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. यातील आरोपी हे जुना मोदिखाना कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत (Wanwadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.