Pimpri : मधुमेहदिनानिमित्त निगडीत वॉकेथॉनास लक्षणीय प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, आयएमए पीसीबी आणि सुप्रिम क्लिनिक आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने येत्या रविवारी (दि.18)निगडीत ‘वॉकेथॉन 2018’ चे आयोजन करण्यात आले. या वॉकेथॉनाच   1500  नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथून रविवारी सकाळी साडेसहा वाजता  ‘वॉकेथॉन’ला सुरुवात झाली. वॉकेथॉन’ला फुगे सोडून सुरुवात झाली. यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी,  रोटरी डिस्ट्रीक्टचे मेडिकल चेअरमन डॉ. भुसारी,  ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर,   प्राधिकरण रोटरी क्लब च्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, डॉ. मानसी व विनायक हराळे, रवींद्र कदम आदी उपस्थित होते.

तीन किलोमीटर अंतराचा वॉकेथॉन होती.वॉकेथॉनमध्ये हजार पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग होता. वॉकेथॉनमध्ये सहभागी होणा-यांच्या रक्तातील साखरेची उपाशीपोटी आणि खाल्यानंतर तपासणी करण्यात आली .
याशिवाय बीपी आणि डोळ्यांची तपासणी देखील केली. डॉ. विनायक व डॉ. मानसी हराळे ,डॉ. महेश पाटील, मृदुला सांगगावकर, ड़ॉ. सुजय नाईक, भाग्यश्री पंडीत व शितल तांबे यांनी नागरिकांना मधुमेहासंदर्भात माहिती दिली.   रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, आयएमए पिंपरी, चिंचवड, भोसरी व सुप्रीम क्लीनिक यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.