Chinchwad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर वार

एमपीसी न्यूज – वडिलांशी दोन तरुण हुज्जत घालत असल्याचे दिसल्याने तरुण भांडणे सोडविण्यासाठी गेला असता दोघांनी मिळून तरुणावर धारदार शस्त्राने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास आनंद नगर झोपडपट्टी येथे घडली.

मंगेश ज्ञानेश्वर कांबळे (वय 22, रा. आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद नगर झोपडपट्टी येथे काळुराम पवार यांच्या कार्यालयासमोर रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगेश यांचे वडील ज्ञानेश्वर कांबळे यांच्याशी ओंकार आणि त्याचा भाऊ आदेश दोघेजण हुज्जत घालत मारहाण करत होते. ही हुज्जत वाढून त्यातून वाद निर्माण होऊ नये यासाठी मंगेश भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी ओंकार यांनी आदेश या दोघांनी मंगेश यांना धारदार शस्त्राने मारले. यामध्ये मंगेश जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.