Varanasi Crime News : वाह रे बहाद्दर ! यांनी तर थेट पंतप्रधानांचे कार्यालयच ओएलएक्सवर टाकले विक्रीला

एमपीसी न्यूज – वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी ओएलएक्स हि ऑनलाईन वेबसाईट प्रसिद्ध आहे. या वेबसाईटवर काही बहाद्दरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसीतील कार्यालय विक्रीला काढल्याची जहिरात टाकली आहे. वाराणसी पोलिसांनी अधिक तपास केला असता ही जाहिरात काही उचापतीखोर लोकांनी टाकली असल्याचं समोर आलं. त्यानुसार संबंधीत चार लोकांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील कार्यालयाचा फोटो काढून ओएलएक्सवर टाकला. त्यांनी या कार्यालयाची 7.5 कोटी रुपये विक्री किंमत ठरवली होती. एवढेच नव्हे तर कार्यालयाच्या आतील भागाचे फोटो, खोल्या, पार्किंगची सुविधा व इतर बाबींची माहिती दिली होती.

दरम्यान, वारणसी पोलिसांनी तातडीनं ओएलएक्सशी संपर्क करुन ही जाहिरात हटवण्यास सांगितली. वाराणसी पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, वाराणसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली असून यासंबंधी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने हे फोटो काढले आणि ओएलएक्सवर टाकलेत, त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.