Ward structure of PMC : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आज अंतिम होणार!

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या (Ward structure of PMC) प्रभागरचना संदर्भात आज (दि. 10) राज्य निवडणूक विभागाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम प्रभाग रचनेबाबत अंतिम बैठक होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच 11 मार्च पर्यंत प्रभाग रचनेची जी कारवाई झाली होती तीच पुढे कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Pimpri News : जनसंवाद सभा आठवड्यातून दोनवेळा घ्या; एमआयएमची मागणी

महापालिकेच्या 58 प्रभागांवरील (Ward structure of PMC) हरकती व सूचनांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून ‘यशदा’चे चोकलिंगम यांनी प्रभाग रचनेचा अहवाल 10 मार्चला राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे. आता केवळ निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना करणे बाकी आहे, त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर येत्या आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mumbai : राज्यभरात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.