Pune Municipal Election 2022 : पुणे महानगरपालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी उद्या (दि. 23 जून) जाहीर करण्यात येणार आहे. सदर यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे का हे खात्री करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. 

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद

राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार 31 मे 2022 पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी कोणाला मतदानाचा हक्क बजावता येणार याविषयी स्पष्ट करताना प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे इ. स्वरूपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत, मात्र दि. 31 मे 2022 रोजीच्या विधानसभा मतदारयादीमध्ये ज्यांची नावे आहेत अशाच मतदारांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे असे म्हटले आहे.

Ranji Trophy 2022 final : रणजी फायनलचा पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला; मुंबई 248 वर 5 बाद

सदर प्रारूप मतदारयादी शुद्ध स्वरूपात व त्रूटी विरहीत होण्याच्या दृष्टीने या यादीवर हरकती व सूचना मागवण्यात येत असून त्याचा कालावधी 23 जून 2022 ते 01 जुलै २०२२रोजी सायं. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत असणार आहे.

दरम्यान, हरकती व सूचनांच्या अनुषंघाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखानिकांकडून होणाऱ्या चूका, मतदाराचा चूकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतील असे सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे का हे खात्री करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.