Pimpri News: महापालिका निवडणुकीचे प्रभागनिहाय नकाशे क्षेत्रीय कार्यालयात प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना शुक्रवारी (दि.13) जाहीर केली; पण प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले नव्हते. मात्र, आता अंतिम प्रभागरचनेचे प्रभागनिहाय नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयस्तरावरसुद्धा प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रभागनिहाय रचनेचे नकाशे पाहायला मिळणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग लगेच कामाला लागला. 17 मेपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. पण पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याअगोदर म्हणजेच 13 मे रोजी प्रभागरचना जाहीर केली.

आता महापालिका प्रशासनाकडून प्रभागनिहाय सर्व नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 139 इतकी असून, यामध्ये 45 प्रभाग हे त्रिसदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यीय असणार आहे,  अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.