Warje: हायवे परिसर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात 85 जणांचे रक्तदान

Warje: Blood donation of 85 people in the camp organized by Highway Parisar Vikas Foundation

0

एमपीसी न्यूज – वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी वारजे हायवे परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रतिष्ठानच्यावतीने वतीने रक्तदान करण्याचे नियोजन केले. परिसरातील नागरिकांनी यावेळी रक्तदान केले.

आचार्य आनंदरूषी ब्लड बॅंक पुणे यांच्या रक्त पेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. त्याच बरोबर या भागातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी सुध्दा करण्यात आली. या शिबिरात अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

या शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डाॅक्टर सेल तसेच डॉ. प्रदीप ठुबे, डाॅ. नरेंद्र खेनट, डाॅ. अजित पाटील, डाॅ. परशुराम सूर्यवंशी, डाॅ. सचिन भोसले, डाॅ. संगीता खेनट यांनी विशेष सहकार्य केले.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती येनपुरे, अनिल गायकवाड, निंबा बोरसे, महादेव गायकवाड, सुरेश जाधव, मोहित वेलाणी, अरूण पाटील, मनिष धुमाळ व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबिर व डाॅक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. प्रभाग क्रमांक 31 आणि 31 मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like