Warje: क्वारंटाईन केलेल्या 54 जणांच्या तीन दिवसात स्वॅब टेस्ट न घेतल्याने नागरिक संतप्त

Warje: Citizens angry over non-taking of swab test in three days of 54 quarantined people

एमपीसी न्यूज – वारजेत शुक्रवारी कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यावर त्या भागातील 54 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, अद्यापि त्यांच्या स्वॅब टेस्ट न घेतल्याने हे नागरिक संतप्त झाले आहेत.

कर्वेनगर येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमध्ये या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या नागरिकांची अजूनही स्व्याब टेस्ट न करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्वारंटाईन केल्यानंतर लगेच स्व्याब टेस्ट घेऊन तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. पण, या नागरिकांची कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही.

त्या ठिकाणी तातडीने महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली  धुमाळ यांनी भेट दिली. एनआयव्ही लॅबमध्ये दुरुस्ती करण्यात आली असल्याने App विकसित केलेले आहे. त्यामध्ये माहिती भरल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी जास्त लोड असल्याने कोणतीही माहिती भरता येत नाही. या नागरिकांची तपासणी होत नसेल तर त्यांना कशासाठी क्वारंटाईन केले, असा संतप्त सवाल दीपाली धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

या नागरिकांमध्ये जर आणखी काही नागरिक कोरोनाचे पॉझिटिव्ह आले तर इतर नागरिकांनाही त्याचा धोका होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे डेक्कन, कर्वेरोड, पौंड रोड, वारजे कर्वेनगर, एसएनडीटी रोड या परिसरात अनेक ठिकाणी कवरांनटाईन केंद्र निर्माण केलेले आहेत. परंतु, तेथील रुग्णांची स्व्याब टेस्टीग वडगाव सिंहगड काॅलेज किंवा धायरीतील लायगुडे हाॅस्पिटलमध्ये केली जाते. त्यामुळे टेस्टिंग रिपोर्ट वेळेत येत नाही.

सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक ठिकाणी स्वॅब टेस्ट केंद्राची निर्मिती करावी, वेळेत तपासणी झाली तर पाॅझीटिव्ह रुग्णांची संख्या सुध्दा कमी होईल. कोरंनटाईन केंद्र सुध्दा वाढविण्यात यावे, आशा अनेक मागण्या दीपाली धुमाळ यांनी  आयुक्तांकडे केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III