मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Warje Crime News : डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास अटक

एमपीसी न्यूज – ‘मी इथला भाई आहे’, असे म्हणून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगड मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. कर्वेनगर चौकात रविवारी (दि.25) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे.

वैभव उर्फ पप्या उकरे (वय 24, रा. वडारवस्ती, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, आणखी एक जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय उर्फ सूरज पुजारी (वय 30, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या वडील व कामगार यांना ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादी यांच्या डोक्यात दगड व लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे. वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news