Warje Crime News : अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज -पदपथावर भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी केलेले ( Warje Crime News) अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली. हा प्रकार वारजे एनडीए रस्त्यावर घडला.याप्रकरणी महापालिकेतील सहायक निरीक्षक (वय 31, रा. दत्तनगर, सासवड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

 Chaitra : ओळख मराठी महिन्यांची… भाग 1 – हिंदू पंचांगातील पहिला महिना ‘चैत्र’

 

 

त्यावरून वारजे पोलिस ठाण्यात आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय 32, रा. वारजे), रोहन मल्हारी बाळशिखरे, सुभाष मारुती बोडके (दोघे रा. शिवणे) आणि गणेश गोरबा हुंबरे (वय 30, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे ( Warje Crime News)आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.