Warje Crime News : हुंड्यासाठी वीस वर्षांच्या महिलेस केले आत्महत्येस प्रवृत्त

एमपीसी न्यूज – वारंवार माहेरुन हुंडा आणि सोने घेऊन ये या मागणीबरोबरच सतत शारीरिक व मानसिक छळ करुन महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना वारजे गावठाण येथे घडली आहे.

रविवारी (दि. 3 जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास वारजे गावठाणातील रामनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी संगीता हरपळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा पती विशाल बराटे (वय 32), तुषार बराटे( वय 30) आणि एका महिलेस अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या अधिक माहितीसाठी, फिर्यादी यांच्या मुलीचे 2019 मध्ये लग्न झाले होते. सासरी नांदत असतानाच पती व त्याच्या नातेवाईकांनी संगनमत करून संबंधित महिलेस “तुझ्या लग्नात तुझ्या आई-वडिलांनी फक्त चार लाख रुपये खर्च केले आहेत. तू फुकटात आली आहेस.

आम्हाला हुंडा म्हणून 50,000 रुपये आणि दिवाळीला सासरकडील लोकांसाठी दोन तोळे घेऊन ये”, अशी मागणी केली. सततची शिवीगाळ, मारहाण, तुला नांदवणारच नाही, अशी धमकी देऊन तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करून त्यांनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमृत मराठे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.