Warje – भरदूपारी फ्लॅटमध्ये घुसून 2 लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – भरदुपारी फ्लॅटमध्ये घुसून 2 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी दि.29) दूपारी 1 च्या सुमारास वारजे माळवाडी येथील बलभीम पार्क सिप्ला सेंटर जवळील एका फ्लॅट मध्ये घडली आहे.

याप्रकरणी राहुल नाईक (वय 33, रा.वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी राहूल यांच्या पत्नी त्यांच्या मुलीला शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी तिच्या शाळेमध्ये दूपारी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा राहिला . दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटमध्ये भरदूपारी प्रवेश केला आणि बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले तब्बल 1 लाख 84 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.