Pune News : गोळीबाराच्या घटनेने वारजे हादरले, लघुशंकेसाठी बाहेर आलेल्या व्यक्तीवर गोळीबार

एमपीसी न्यूज : वारजे माळवाडी परिसर पुन्हा हादरला असून, खुनातून शांतता होत असतानाच मध्यरात्री झोपडपट्टीत गोळीबार झाला आहे. पहाटे हा गोळीबार झाला असून, यामुळे पुन्हा दहशत पसरली आहे. दरम्यान हल्लेखोर पसार झाले आहेत.

या गोळीबारात अमर चव्हाण (वय 34) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोर पसार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमर हे ब्रिजजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहतात. दरम्यान ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घरातून लघुशंका करण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. यात एक गोळी त्यांना लागली असून, त्यात ते जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.