Weather Update : पुण्यात आजपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अर्लर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई विभागीय हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे. 

पुण्यात आजपासून (दि.12) ते 15 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात देखील हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, पिकांचे नुकसान देखील अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, झाडं उन्मळून पडन्याची शक्यता आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा मुंबई विभागीय हवामान खात्याने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.