Weather Report: कोकण व गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Warning of heavy rains in some places in Konkan and Goa and heavy rains in sparse places कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

एमपीसी न्यूज – कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे: कोकण आणि गोवा: श्रीवर्धन 15, दापोली, मंडणगड 12 प्रत्येकी, म्हसळा 9, सुधागड पाली 8 , कानकोना, हरनाई, मुळदे 7 प्रत्येकी , भिरा, संगमेश्वर देवरुख, वाल्पोई, वेंगुर्ला 6 प्रत्येकी , गुहागर, कुडाळ, माणगांव, पणजी (गोवा), राजापूर 5 प्रत्येकी, खेड, म्हापसा, मडगाव, पेडणे, केपे, सांगे 4 प्रत्येकी, चिपळूण, दाभोलीम (गोवा), दोडामार्ग, लांजा, मुंबई (कुलाबा), रत्नागिरी, सावंतवाडी 3 प्रत्येकी, देवगड, कणकवली, महाड, मालवण, मुरुड , पोलादपूर, रोहा 2 प्रत्येकी, अलिबाग, कर्जत, पेण, रामेश्वर कृषी, ठाणे, उरण, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: माळशिरस, सतना बागलाण 6 प्रत्येकी, चाळीसगाव 5, नांदगाव 4, गगनबावडा, मालेगाव, श्रीरामपूर, वेल्हे 3 प्रत्येकी, भडगाव, चांदवड, महाबळेश्वर, राधानगरी, साक्री, येवला 2 प्रत्येकी,  देवळा, एरंडोल, गिरना धरण, जामखेड, जावली मेधा, पन्हाळा, शाहूवाडी 1 प्रत्येकी.

मराठवाडा: सेलू 4, आष्टी, कन्नड, परतूर, रेणापूर 3 प्रत्येकी, औरंगाबाद, परळी वैजनाथ 2 प्रत्येकी, भोकरदन, जाफरबाद, शिरूर अनंतपाल, शिरूर कासार 1 प्रत्येकी.

विदर्भ: मुलचेरा 4, चिखली 3, भामरागड, तेल्हारा 2, बार्शी टाकळी, एटापल्ली, मेहकर, शेगाव, सिंधखेड राजा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: कोयना पोफळी 7, ताम्हिणी 6, डुंगरवाडी 5, अम्बोणे, दावडी 3 प्रत्येकी, शिरगाव 2, कोयना ( नवजा) 1.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: वैतरणा, विहार, तुलसी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

2 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
3 जुलै – 4 जुलै: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
5-6 जुलै: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*

इशारा :

2 जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता* मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी
मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.*
3 जुलै: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like