Weather Report : कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा

Warning of heavy rains sparse places in Kokan - Goa and Central Maharashtra.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी , मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : माथेरान 18, भिरा 16, महाड 15, मंडणगड 14, पोलादपूर 13, रोहा 12, वाडा 11, अंबरनाथ, सुधागड पाली, उल्हासनगर ९ प्रत्येकी, कल्याण, मुंबई (सांताक्रूझ), पेण 8 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), हरनाई, माणगाव, मुरुड, सावंतवाडी, विक्रमगड 7 प्रत्येकी, कानकोना, म्हसळा, संगमेश्वर देवरुख, ठाणे, वाल्पोई, वसई 6 प्रत्येकी, भिवंडी, कर्जत, खालापूर, राजापूर, शहापूर 5 प्रत्येकी, अलिबाग, चिपळूण, दोडामार्ग, जव्हार, खेड, म्हापसा, पनवेल , श्रीवर्धन, उरण, वैभववाडी 4 प्रत्येकी, कणकवली, लांजा, मडागव, मुरबाड, पालघर, सांगे, वेंगुर्ला 3 प्रत्येकी, कुडाळ, मोखेडा, मार्मगोवा, पेडणे, रामेश्वर कृषी, तलासरी २ प्रत्येकी, डहाणू, देवगड, गुहागर, मालवण (गोवा), केपे, रत्नागिरी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, राधानगरी 15 प्रत्येकी, लोणावळा (कृषी) 14, चांदगड, गगनबावडा 12 प्रत्येकी, इगतपुरी 11, आजारा 10, पन्हाळा, वेल्हे 9 प्रत्येकी, पोड मुळशी, शाहूवाडी, त्र्यंबकेश्वर 7 प्रत्येकी, अक्कलकुवा, भोर, गडहिंगलज, खटाव वळूज, नंदुरबार, पाटण, शिराला 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, हर्सूल, कोल्हापूर, नवापूर, ओझरखेडा, पेठ, रावेर, वडगाव मावळ 2 प्रत्येकी, चोपडा, हातकणंगले, जत, कडेगाव ओझर, पुणे, पुरंदर सासवड, सांगली, सातारा, शिरोळ, वाई, वाळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : अहीरी, एटापल्ली 2 प्रत्येकी, बार्शी टाकळी, भामरागड, चामोर्शी, चिखलदरा, कोरची, सिरोंचा, झरी झमनी 1 प्रत्येकी.

घाटमाथा : अम्बोणे, कोयना(नवजा), ताम्हिणी 25 प्रत्येकी, दावडी 23, शिरगाव 22, इंगरवाडी 14, लोणावळा(ऑफिस) 14, लोणावळा(टाटा) 11, वळवण, खोपोली 9 प्रत्येकी, कोयना (पोफळी), खंद 6 प्रत्येकी, शिरोटा 5, ठाक्रवाडी 4, वाणगाव, भिवपुरी 3 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

08 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

09 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

10-11 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा :

08 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

09 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

10-11 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहुन हलक्या ते मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.