Wakad : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डिलिव्हरी बॉयवर वार

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून डिलिव्हरी बॉयवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. ही घटना साईनाथ नगर थेरगाव मधील चिकन सेंटर समोर शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी घडली.

 

निलेश अशोक साळवी (वय 19, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कैलास वंजारी व त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश उबेर इट्स या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी सायंकाळी तो साईनाथ नगर थेरगावमधील चिकन सेंटर समोरुन जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीच्या आरोपींनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. निलेशने आरोपींना दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत. यावरून तिघांनी मिळून निलेशला शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये निलेशच्या हातावर, मानेवर, खांद्यावर गंभीर दुखापत झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.