Warning to the Rebels : सामनातून बंडखोरांना दिला इशारा

एमपीसी न्यूज – राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर गेले आहे. शिवसेनेत फुट पडली आसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून बंडखोर आमदारांना वेळीच शहाणे व्हा असा इशारा (Warning to the Rebels)  देण्यात आला आहे.

 

अग्रलेखात काय म्हंटले आहे

राज्यसभा, विधान परिषट निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे झाला हे आता उघड झाले आहे. आता तर आमदारांना डांबून ठेवले गेले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले गेले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी सांगितले आहे.शिवसेनेने असे अनेक प्रसंग पडविले आहेत, अशा संकटांना छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली आहे.सत्ता असली काय आणि गेली काय शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही.फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे माजी होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

 

 

लोकांनी आमदार – नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार पुन्हा स्वगृही परत येतील.प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा फेकून देतील.भाजपची परंपरा तर हीच आहे.त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल.

 

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील जादा विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले आहे.आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे.शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचविले आहेत. शिवसैनिकांनी ठरविले तर हे सगळे लोक कायमचे माजी होऊ शकतील. यापुर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! अशा शब्दात खोचक टोमणे मारत बंडखोरांना इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.