Maval : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही सक्षम उमेदवार नव्हता? – अॅड. खंडुजी तिकोणे

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्षम व निष्ठावान उमेदवार असताना एक दिवसात दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी देत असेल अशा उमेदवाराचा विचारधारेचा विचार होत नसेल तर मग आघाडी धर्म का पाळायचा, असा सवाल काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांनी उपस्थित केला आहे.

मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सलग चार वेळा पराभूत झालेला आहे. तरीही तो मावळावरील हक्क सोडत नाही. आघाडीचा फॉर्म्युला ठरताना तीन वेळा पराभूत झालेले मतदारसंघांची आदलाबदल करावयाचे ठरलेले असताना राष्ट्रवादीने मावळची जागा घेतली. त्यालाही फारसा माझा विरोध नव्हता पण उमेदवाराची विचारधारा वेगळी असल्याने आमचा विरोध आहे, असे तिकोणे यांनी म्हटले आहे. माझे काय चुकले, असा सवालही अॅड.तिकोणे यांनी केला आहे.

आयात उमेदवाराला मते दिली काय आणि भाजपला मते दिली काय, दोन्ही सारखेच आहे म्हणून आपण बंडखोरी केली आहे. माझ्या विचारांशी सहमत असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहे. मावळच्या आम जनतेला आपण नम्र विनंती करतो की, धनधांडग्यांचा विजय म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.

आपला विजय म्हणजे केवळ पैशाने निवडणूक जिंकता येत नाही हे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारा असेल.  आपला पराभव म्हणजे चांगल्या कार्यकर्त्यांना राजकारणात कधीच संधी मिळणार नाही, पैशावाल्यांनाच राजकारणात संधी आहे. हा चुकीचा संदेश जाईल म्हणून तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी वरील बाबींचा विचार करून ‘कपबशी’च्या चिन्हा समोरील बटण दाबून मला विजयी करावे, अशी विनंती तिकोणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.