Waste collection center : अखेर प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित होणार

एमपीसी न्यूज : निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे महापालिकेने प्रस्तावित केलेले कचरा संकलन केंद्र स्थलांतरित होणार आहे. लोकवस्तीपासून हे केंद्र लांब करावे.(Waste collection center) त्यासाठी पर्यायी जागा शोधण्याची सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अधिका-यांना दिली. केंद्र स्थलांतरित करण्यासाठी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी सुरुवातीपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मागणीची दखल घेतल्याबद्दल गावडे यांनी प्रशासनाचे आभारही मानले.

शहरातील घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर चार ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते. (Waste collection center) परंतु, हे केंद्र दाट लोकवस्तीत उभारले जात असल्याने सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक अमित गावडे यांनी त्याला तीव्र विरोध केला. हे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्याविरोधात आवाज उठविला. त्यानंतरही प्रशासनाने गुरुवारी पुन्हा काम सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गावडे यांनी तत्काळ तिथे धाव घेतली. काम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

Pimpri Corona Update : शहरात आज 62 नवीन रुग्णांची नोंद; 81 जणांना डिस्चार्ज

आयुक्त शेखर सिंह यांनी याची दखल घेतली.  प्रस्तावित असलेले कचरा संकलन केंद्र अतिशय दाट लोकवस्तीत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात घरे आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होईल. कचरा संकलन केंद्राची जागाही रिंगरोडची आहे. त्यामुळे याठिकाणी केंद्र करु नये अशी ठाम भूमिका माजी नगरसेवक अमित गावडे यांनी घेतली. त्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली.(Waste collection center) ”दाट लोकवस्तीत कचरा संकलन केंद्र करु नये. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करावे. त्यासाठी वाहतूक असलेल्या भागात पर्यायी जागा शोधण्याची सूचना त्यांनी अधिका-यांना केली असल्याचे माजी नगरसेवक गावडे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.