Bhosari : एमआयडीसीतील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीत जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. भोसरी एमआयडीसीतील डायनोमर्क कंपनीच्या समोर एस 101 ब्लॉकमध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी आज वाया गेले.

यावेळी कामगराच्या दुपारच्या जेवणाची सुट्टी आसल्यमुळे कामगारांनी बघितले त्याक्षणी त्यांनी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांना बोलावले. त्यांनी लगेचच आभियंता संतोष तावल यांच्याशी संर्पक साधला. तावल यांनी तातडीने गाडीसह सर्व कर्मचा-यांना बोलावले. युद्ध पातळीवर काम चालू केले तोपर्यंत खूप पाणी वाया गेले होते.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी केले होते. परंतु काळजीपूर्वक केले नसल्याने पाणी वाया गेल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.  अजूनही काम चालूच आहे.  यावेळी रवी भेंनकी, सुर्यकांत मुळे, दशदथ कांबळे, बन्सी मनोरे, पंडित वनसकर, ईश्वर सोनोने, सचिन नेमाडे, बबन मगर आदींनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.