Pune News : सहा वर्षीय मुलासोबत अश्लील चाळे करणाऱ्या वॉचमनला बेड्या

0

एमपीसी न्यूज : सोसायटी मध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या एका नराधमाने सोसायटीच्या मोकळ्या आवारात खेळणार्‍या सहा वर्षीय मुलासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. खडकीतील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

संबंधित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर शंकर दत्तू अहिरे (वय 63) या च्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खडकीतील एका सोसायटीत शंकर अहिरे हा वॉचमन म्हणून काम करतो. फिर्यादी यांचा 6 वर्षीय मुलगा सोसायटीत खेळत असताना आरोपी त्याच्या मागे गेला आणि त्याच्या सोबत अश्लील चाळे केले. तीन वेळेस हा प्रकार घडला. दरम्यान याची माहिती समजल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment