सतीश वर्तक यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे आयोजन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- निसर्गाच्या विविध रूपांना आपल्या चित्रांमधून साकारणारे सुप्रसिद्ध चित्रकार सतीश वर्तक यांच्या निसर्ग चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन आज, मंगळवारी पुण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार राहुल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात निसर्गातील विविध रंगांचे गारुड ललित वर्तक यांच्या छायाचित्रातून आणि सतीश वर्तक यांच्या चित्रातून बघण्याची संधी पुणे रसिकांना मिळाली आहे. 2006 पासून कलेचा छंद जोपासना करणाऱ्या बाप-लेकांनी कुठलेही कलेचे शिक्षण न घेता, सततची साधना आणि सराव करुन ही कला जोपासली. पुणे, मुंबई आणि अन्य राज्यात यांनी आपली कला प्रदर्शनं आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आजपर्यंत सादर केली आहे.या प्रदर्शनात जलरंगातील चित्रं आणि छायाचित्रांच्या केनव्हास प्रिंटचा आस्वाद आपण घेऊ शकता.

पुण्यातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स पू. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या ‘आर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत नवोदित आणि नावाजलेल्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाते. हे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील शोरूममधील आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार दि. 19 अॉगस्ट पर्यंत सर्व रसिकांसाठी सकाळी 11 ते 8 पर्यंत विनामूल्य खुले रहाणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.