Pune : गिरीश महाजन यांनी पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले – चेतन तुपे 

एमपीसी न्यूज – शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत आज मुंबईत घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. या निर्णयावर आता सत्ताधाऱ्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. 

24 बाय 7 च्या गप्पा मारणारे आणि सूट बूट घालून शेअर मार्केट मध्ये जाऊन घंटा वाजवणाऱ्यांनी आज पुणेकरांना  ‘घंटा’ दिलाय अशी खरमरीत टीका पुणे महापालिकेच्या विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी केली आहे. तर गिरीश महाजन यांनी कालवा समितीची बैठक घेतली आणि  पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवल असा हल्ला देखील चेतन तुपे यांनी भाजपवर चढवला

दरम्यान, 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढले मग आता ती योजना काय गुंडाळून टाकणार का ? तर  पुणेकरांनी 100 नगरसेवक सेवक 8 आमदार अन खासदार काय पुण्याचे पाणी पळवायला निवडणुन दिलाय का ? असा सवाल सुद्धा तुपे यांनी केला

महाजनांच्या बुद्धीवर संशय

या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव आहे.  उंदीर घुशी कालवा फोडणारे वक्तव्य करणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बुद्धीवरच संशय येतोय ते काय नियोजन करून कपात करणार असे देखील चेतन तुपे म्हणाले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.