Charholi : चऱ्होलीतील यशोभूमी सोसायटीत पाणीसंकट

एमपीसी न्यूज – यशोभूमी सोसायटी, वडमुखवाडी, चऱ्होली या सोसायटीमध्ये (Charholi) पाण्याची समस्या गंभीर आहे. या सोसायटीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पाणी खूप कमी प्रमाणात मिळते. या सोसायटीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रसाद आल्हाट यांना समक्ष सोसायटीमध्ये घेऊन जाऊन पाण्याच्या प्रश्नाची दाहकता प्रत्यक्ष दाखवली. मात्र, त्याबाबत आद्याप कार्यवाही झाली नाही.

यशोभूमी सोसायटीमध्ये 200 सदनिका आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे. दोन दिवसांमध्ये या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

तसेच, जोपर्यंत सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत महानगरपालिकेद्वारे या सोसायटीला टँकरने पाणी पुरवण्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे व टँकर चालू केले आहेत. दोन दिवसांनी जर या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला (Charholi) नाही, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर या सर्व महिला भगिनींना घेऊन जाऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Baramati : आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा; शरद पवार कार्यक्रमस्थानी हजर

चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, “चऱ्होलीमधील बऱ्याच सोसायटीमध्ये सध्या पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बिल्डर कडून हमीपत्र लिहून घेतलेले आहे. भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन महानगरपालिका पूर्ण क्षमतेने जोपर्यंत पाणी पुरवत नाही तोपर्यंत विकासाकांनीच स्वखर्चाने पाणी पुरवायचे आहे. परंतु, ना बिल्डर पाणी पुरवतो ना पिंपर- चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवते आणि बिल्डरवर पाणी न पुरवल्यामुळे कोणती कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित बिल्डरवर भारतीय दंड संहिता कलम 200 प्रमाणे हमीपत्राचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे नोंद करावेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.