Pune News : पुणे पाण्यात, नेते राजकारणात !

महापालिकेने सीमाभिंत बांधली नाही म्हणून नागरिकांच्या घरात पाणी; खा.सुप्रिया सुळे यांचा भाजपावर आरोप

एमपीसी न्यूज : अतिवृष्टीमुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. संपुर्ण पुणे शहर पाण्यात आहे. पण लोकप्रतिनिधी नेते मात्र राजकारणात दंग झाले आहेत. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सीमाभिंत बांधली नाही म्हणून नागरिकांच्या घरात पाणी गेेल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कात्रज परिसरातील विश्वकर्मा नगर येथे पूरसदृश्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या, “दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत कोसळली होती. त्यानंतर महापौर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सरंक्षक भिंत बांधण्याची मागणी आमचे नगरसेवक करत होते. तातडीने भिंत बांधण्यासाठी पाठपुरावा करत होते. पण महापलिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. त्यांच्या भोंगळ कारभारामुळे लोकांचं आज नुकसान झालं आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या होणाऱ्या कोविड आढावा बैठकीमध्ये समक्ष भेट घेऊन मार्गदर्शन घेणार आहोत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.