Wakad: परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार; अमृत योजनेच्या कामास सुरूवात

स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ 

एमपीसी न्यूज – वाकड मधील दक्षतानगर, कस्पटेवस्ती येथे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 160 मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता  गायकवाड यांच्या हस्ते आज (गुरुवारी)कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे वाकड परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. 

कामाच्या शुभारंभाप्रसंगी यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे, कनिष्ठ अभियंता सचिन कुतवळ यांच्यासह वाकड परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वाकड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या होती. येथील पाईपलाईन जुनी असल्या कारणाने या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. याबाबत नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार मांडली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत गायकवाड  यांनी  पाणीपुरवठा विभागाशी पाठपुरावा केला. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करावा. जोपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले होते.

गेले काही दिवस या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू होता. आज अमृत योजने अंतर्गत 160 मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकून या कामास सुरुवात करण्यात आली. यामुळे वाकड परिसराती पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.