Pune : अत्याधुनिक यंत्राद्वारे पुण्यात पाणी गळती तपासणी सुरू

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन चोवीस तास समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात शहरातील कोणत्या भागात पाईप लाईनद्वारे पाणी गळती सुरू आहे. याचा शोध घेण्यासाठी पाणी गळतीचा शोध घेणारे यंत्र आज दाखल झाले असून अत्याधुनिक यंत्राद्वारे निलायम चित्रपट गृहाजवळील भागात पाणी गळती तपासणी करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी म्हणाले की, पुणे शहरात सध्या सुमारे पाण्याची 35 ते 40 टक्के गळती होत असून पाणी गळती अत्याधुनिक या यंत्राद्वारे करून 15 ते 20 टक्के कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.