Water Meter Theft: पाणी मीटर चोरी रोखण्यासाठी सांगवीत पोलिसांचे गस्ती पथक

एमपीसी न्यूज – पाणी मीटर चोरी (Water Meter Theft) रोखण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याने रात्र गस्ती पथक नेमून गस्त सुरु केली आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली.

टोणपे म्हणाले की, सांगवी परिसरातून अंदाजे 30 ते 40 पाणी मीटर चोरी (Water Meter Theft) गेले आहेत. त्याबाबत तक्रारी आल्या आहेत. पाणी मीटर चोरी थांबवण्यासाठी रात्र गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक पहाटे मध्यरात्री 1 ते पहाटे 4 च्या  दरम्यान गस्त घालत असते.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे माजी सरचिटणीस कुंदन कसबे यांनी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांची भेट घेऊन सांगवी परिसरात पाणी मीटर चोरीच्या (Water Meter Theft) वाढत्या घटना बाबत बुधवारी निवेदन दिले.

 

पितळ विकण्यासाठी पाणी मीटर चोरी? 

सांगवी भागात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पाणी मीटरची चोरी होत आहे. गेली एक महिना जुनी सांगवी मधील शिंदेनगर, पवारनगर, जय मालानगर व इतर परिसरात पाणी मीटर चोरी होत आहे. पाणी मीटरमध्ये पितळ असते जे चोर विकून पैसे घेतात, असे कसबे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

“ह” प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात पाणी मिटर चोरीबाबत 40 पेक्षा अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. पाणी मीटरची किंमत अडीच हजार रुपये आहे. महानगरपालिका पाणी मीटर संरक्षणाची जबाबदारी आमची नाही, असे स्पष्टपणे सांगत आहे. यामुळे नागरिकांना थेट आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, अशी तक्रार कसबे यांनी केली आहे.

 

MAHAVITARAN News : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस्अॅपद्वारे माहिती द्या; महावितरणचे नागरिकांना आवाहन

रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि सांगवी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करून पाणी मीटर चोरी करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

150 ते 200 मीटर चोरीला? 

मुळानगर येथील रहिवासी विश्वनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी 11 फेब्रुवारी 2022 ला नवीन पाणी मीटर बसवला, पण तो 15 एप्रिल 2022 ला चोरीस गेला. त्याबाबतची तक्रार प्रभाग कार्यालयात दिली आहे.  आपला पाणी मीटर चोरीस (Water Meter Theft) गेला, त्या दिवशी आमच्या परिसरातील 10 पाणी मीटर चोरीस गेले होते.
सांगवी परिसरात अंदाजे 150 ते 200  पाणी मीटर चोरीला गेले असावेत . कारण खूप कमी लोक पोलीस व पालिकेकडे तक्रार करतात.

 

Ketaki Chitale : सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले की, पाणी मीटरच्या सुरक्षेची जबाबदारी नागरिकांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.