Pune : पुण्यावर पाणी कपातीचे संकट ? 

एमपीसी न्यूज – शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी मुंबईत घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा समितीची मुंबईत बैठक झाली. त्यात पुणे शहराला दरदिवशी साडेअकराशे एमएलडी पाणी देण्याचा तर शेतीसाठी रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.