Pune : खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; भिडे पूल जाणार पाण्याखाली

एमपीसी न्यूज – खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणातून मुठा पात्रात दुपारी ४ वाजता १८ हजार ४९१ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

गेल्या महिनाभराच्या खंडानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणं सरासरी ९५ टक्के इतकी भरली असून पावसाचा वेग कायम राहिला तर खडकवासला धरण ओव्हर फ्लो होऊ शकेल. दरम्यान, पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली जाणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.