pune : शहरातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – मुठा उजवा कालवा फुटल्याने पुण्यातील लष्कर भागात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज (दि.२७) दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार आहे, त्यामुळे लष्कर भागातील मुंढवा, कोंढवा, हडपसर, काळेपडळ, येरवडा, कोरेगांव पार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररोड, विमाननगर या भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. नागरीकांनी याची नोंद घ्यावी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.