Pimpri : पिंपरी, दापोडी, सांगवी, पिंपळेसौदागर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव येथील तपोवन मंदिराजवळ चिंचवड गुरुत्व वाहिनीमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी चिंचवड गुरुत्व वाहिनी तसेच सांगवी गुरुत्व वाहिनी बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंचवड परिसरातील आज (गुरुवारी) सायंकाळचा आणि उद्या (शुक्रवारी) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

पिंपरी, पिंपळेसौदागर, सुदर्शन नगर, कल्पतरू, पिंपळेगुरव, सांगवी, दापोडी या भागातील सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. तसेच या भागांचा तसेच कासारवाडीचा (गेटाखालचा भाग) उद्या सकाळचा पाणी पुरवठाही कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.

दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.