Water Supply : उद्या पुण्यातील या भागातील पाणी पुरवठा असणार बंद

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या (Water Supply) जलकेंद्रांमधील विद्युत व स्थापत्यविषयक विविध कामांमुळे उद्या म्हणजे गुरुवारी (दि.22) शहराच्या विविध भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शक्रवारी (दि.23) उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, सहकारनगर, कोंढव्याचा काही भाग, कळस, टिंगरेनगर, म्हस्के वस्ती आदी भागांचा समावेश आहे.

गुरुवारी पर्वती व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे असल्याने या टाक्यांवर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे.

Pune Crime : खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तडीपारास साथीदारांसह अटक

पर्वती एम एल आर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एच एल आर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-1 व 2, लेकटाउन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मीठानगर, कुमार पृथ्वी, स. नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर.

पर्वती एल एल आर टाकी परिसर : शहरातील (Water Supply) सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.

चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग : संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे विमानतळ, राजीव गांधीनगर उत्तर व दक्षिण, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं.1 ते 6, एकतानगर झोपडपट्टी, सिद्धेश्वर, कुमार समृद्धी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.