Pune News : आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद

एमपीसी न्यूज : तळजाई टाकीवरून आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या गुरूवारी  9 मार्च (Pune News)  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे.

Pune News : औंध आयटीआयमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

शुक्रवारी ( 10 मार्च ) म्हणजे दुस-या दिवशी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. (Pune News) आंबेगाव पठार सर्वेक्षण क्रमांक 17 ते 40 या भागात गुरूवारी पाणीपुरवठा होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.