Pimpri : शहरातील या भागाचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील पाणीपुरवठा केंद्रात विद्युत, यांत्रिकी स्थापत्यविषयक दुरुस्तीकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आज (गुरुवारी) रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Kharadi : खराडी परिसरात एक दिवसाआड पाणी पुरवठा
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 9) पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पिंपरी (Pimpri) , चिंचवड, भोसरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघीतील आर ॲण्ड डी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. नागरिकांनी या काळामध्ये पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.